एकाच चेहऱ्यानं सॉफ्टवेअर इंजिनिअर जगायचा २ आयुष्य; रहस्य उघड होताच पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:30 IST2023-05-24T09:29:14+5:302023-05-24T09:30:01+5:30
तो अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये राहायचा. एलेक्सी हा केपीएमजी कंपनीत काम करायचा.

एकाच चेहऱ्यानं सॉफ्टवेअर इंजिनिअर जगायचा २ आयुष्य; रहस्य उघड होताच पोलीस हादरले
नवी दिल्ली - एक युवक समाजात इज्जतीत आयुष्य जगत होता. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. परंतु त्याच्या एका चेहऱ्यामागे दुसरा क्रूर चेहरा लपला होता. जेव्हा हा खरा चेहरा जगासमोर आला तेव्हा त्याला ओळखणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्यक्ती इतका क्रूर आणि भयंकर असेल असा कुणीही विचार केला नव्हता.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय एलेक्सी साब असं या व्यक्तीचे नाव आहे. ज्याने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने ट्रेनिंग दिले होते. एलेक्सीला आता १२ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तो अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये राहायचा. एलेक्सी हा केपीएमजी कंपनीत काम करायचा. तो मायक्रोसॉफ्टचाही कर्मचारी होता. न्यूयॉर्क शहरातील अनेक ठिकाणी त्याने रेकी केली होती जिथे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यात शहरातील एअरपोर्टचाही समावेश आहे.
४ प्रकरणात आढळला दोषी
एलेक्सी साबवर दहशतवादी संघटनेकडून मिलिट्रीसारखे ट्रेनिंग घेतले होते. त्याचसोबत एका युवतीला जाळ्यात फसवून त्याने लग्न केले. खोटे जबाब नोंदवणे यासारखे अनेक आरोप आहेत. दहशतवादी संघटनांकडून घेतलेल्या ट्रेनिंगमध्ये तो दोषी आढळल्याने त्याला १० वर्षाची शिक्षा झाली आहे. तर साब हिजबुल्लाह संघटनेला साहित्य पुरवत होता.
कोर्टात सुनावणीवेळी असिस्टेंट यूएस अटॉर्नी सैम एडल्बर्ग म्हणाले की, हा एका सर्वसामान्य व्यक्तीसारखा राहत होता. परंतु तो हिजबुल्लाहचा स्लीपर एजेंट होता. जो दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होता. एलेक्सी साब जेव्हा लेबनान इथं कॉलेजचे शिक्षण घेत होता तेव्हा संघटनेकडून त्याची नियुक्ती केली होती. तो अमेरिकेत स्लीपर एजेंट बनला होता. पुरावे म्हणून साबने दहशतवादी हल्ल्यासाठी न्यूयॉर्क शहरातील अनेक प्रमुख ठिकाणांची पाहणी केली होती. कोर्टाने या प्रकरणी साबला दोषी ठरवत १२ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.