Husband Wife Crime News: कर्जामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. पती, पत्नीने आपल्या चार वर्षाच्या मुलाला विष दिलं. त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांना मयताच्या घरात सुसाईड नोट मिळाली असून, त्यामुळे तिघांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोक्यावर वाढलेलं कर्ज, बिघडलेलं आर्थिक गणित यामुळे पती, पत्नीने कुटुंबच संपवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात ही घटना घडली. पती, पत्नीने चार वर्षाच्या मुलाला विष दिल्याचे समोर आले.
सचिन, शिवानीचे मृतदेह घरात लटकलेले
पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी घटनेबद्दलची माहिती दिली. एका कॉलनीमध्ये सचिन ग्रोवर (वय ३०), शिवानी (वय २८) यांनी चार वर्षाचा मुलगा फतेह याला विष दिले. सचिन हातमाग उद्योग करायचा. मुलाला विष देऊन मारल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. फतेह याचा मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या आढळून आला.
सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांना घरात एक चिठ्ठी मिळाली. त्यात सचिनने कर्जामुळे खूप त्रस्त झालो आहे. वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेतले होते. पण, उत्पन्न मिळत नव्हतं, त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. या वाईट काळात कुणीही आधार दिला नाही.
"माझी कुटुंबीयांबद्दल कोणतीही तक्रार नाही. सगळ्यांनी मला साथ दिली. आमची कार, घर आणि इतर वस्तू विका आणि माझ्यावरील सर्व कर्जाची परतफेड करा. जेणेकरून कुणीही असं म्हणून नये की आमचे पैसे देणे बाकी आहे", असे सचिन ग्रोवरने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
दुसऱ्या मजल्यावर राहत होते सचिन-शिवानी
पोलिसाच्या प्राथमिक तपासानुसार पती-पत्नीने आधी मुलाला विष दिले. त्यानंतर ते वेगवेगळ्या खोलीमध्ये गेले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. बुधवारी सकाळी कुटुंबातील लोक दुसऱ्या मजल्यावर गेले, तेव्हा ही घटना समोर आली. मंगळवारी रात्रीच त्यांनी स्वतःला संपवले, असे पोलिसांनी सांगितले.