जुन्या रागातून पोटात खुपसला चाकू, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: October 4, 2023 17:25 IST2023-10-04T17:23:52+5:302023-10-04T17:25:53+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जुन्या रागातून पोटात खुपसला चाकू, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३, सीएचएम कॉलेज समोरील अल्फा सॅडविज दुकाना समोर मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता नितेश वालेकर उभे असतांना, जुन्या रागातून मोहित हिंदुजा नावाच्या तरुणाने त्याच्या पोटात चाकू खूपसल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे नितेश वालेकर हे सीएचएम कॉलेज समोरील अल्फा सॅनविज दुकानात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता सॅनविज खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी मोहित हिंदुजा नावाचा तरुण तेथे येऊन, त्याने जुन्या रागातून नितेश वालेकर यांच्या पोटात चाकू खुपसून पळून गेला. नितेश याने पोटात खुपसलेला चाकू पकडून मध्यवर्ती पोलिसांना झालेली घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र पोटातील चाकू काढून शस्त्रक्रिया करण्यासाठी पोलीस संरक्षणात खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पोटात खुपसलेला चाकू नितेश वालेकर याने हाताने पकडून आरोपीला सक्त कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर शस्त्रक्रियासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. रात्री निलेश यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून पोलीस आरोपीच्या मागावर बसलो आहे.