शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:53 IST

पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

सातारा : एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला. यात मुलीच्या बोटाला चाकू लागला तर त्या तरुणाला पकडताना एका व्यक्तीच्या हाताला चाकू लागून तो जखमी झाला. सुमारे पंधरा मिनिटांच्या थरारक घटनेनंतर मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली.आर्यन चंद्रकांत वाघमळे (वय १८, रा. समर्थ काॅलनी, मोळाचा ओढा, सातारा), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.करंजे परिसरातील एक शाळा सायंकाळी सुटल्यानंतर मुले-मुली शाळेतून बाहेर आली. याचवेळी शाळेच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपीने संबंधित मुलीचा हात धरला. त्यानंतर सोबत असलेला चाकू त्याने मुलीच्या गळ्याला लावला. हा प्रकार पाहून इतर मुली आरडाओरडा करू लागल्या. काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी आरोपी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘गळ्याचा चाकू काढ, तुला काय म्हणायचे आहे ते आपण बोलू या; पण तू चाकू काढ,’ अशी विनवणी केली. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘तुम्ही सगळे येथून जावा,’ असे तो सगळ्यांना म्हणत होता. मध्येच तो मुलीच्या गळ्याला चाकू लावायचा. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी बराच प्रयत्न करत होती; परंतु त्याने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते.

असे घेतले ताब्यात..पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला वेढले. समोरच्या बाजूने त्याला पोलिसांनी बोलण्यात गुंतवले. अचानक एका पोलिसाने पाठीमागून दबक्या पावलाने येऊन आरोपी मुलाला धरून जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर त्याला जमावाने चांगलाच चोप दिला. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

चल आपण पळून जाऊ..संबंधित तरुण आणि मुलगी काही महिन्यांपूर्वी एकाच परिसरात राहत होते. मात्र, संबंधित मुलीचे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात दुसरीकडे राहण्यास गेले. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी सतत त्रास देत होता. ‘चल आपण पळून जाऊ,’ असे तो तिला म्हणत होता. हा प्रकार पालकांच्या कानावर घालण्यात आला होता. त्यावेळी त्याला समजावून सांगण्यात आले; परंतु सोमवारी त्याने थेट चाकू घेऊन त्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले.