शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीवरून परतणाऱ्या मुलीवर उबर चालकाने केला बलात्कार, खून करून मृतदेह दिला फेकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:16 IST

Rape Case : डिसेंबर 2017 ची ही घटना बेरूतमध्ये घडली. याप्रकरणी चौकशी समितीने नवे तथ्य उघड केले आहे.

एका 30 वर्षीय मुलीने मुलींच्या नाईटआउटवरून परतत असताना उबेर कॅब बुक केली. वाटेत उबर कॅब चालकाने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्याने पळ काढला. डिसेंबर 2017 ची ही घटना बेरूतमध्ये घडली. याप्रकरणी चौकशी समितीने नवे तथ्य उघड केले आहे.या प्रकरणात यापूर्वीच दोषी ठरलेल्या चालकाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण त्याला फाशी होऊ शकली नाही. आता चालक आपली शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रेबेका डायक्सने बेरूतमधील ब्रिटिश दूतावासात काम केले. कॅब ड्रायव्हर तारिक होशिहोने बलात्कारानंतर तिची हत्या केली होती. तारिकने त्याच्या हुडीच्या स्ट्रिंगने रेबेकाचा गळा दाबला.या प्रकरणी 2019 मध्ये चालकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. रेबेकाच्या मृत्यूची दीर्घकाळ चाललेली चौकशी या आठवड्यात लंडनमध्ये पुन्हा उघडण्यात आली. यानंतर हे खून प्रकरण पुन्हा चर्चेत आले.लंडन न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ब्रिटनची रहिवासी असलेली रेबेका लेबनॉनमधील बेरूत येथील ब्रिटिश दूतावासात काम करत असल्याचे सांगण्यात आले. ती निर्वासितांना मदत करण्याचे काम पाहत होती. ख्रिसमससाठी ती ब्रिटनला परतणार होती, पण त्याआधीच बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. 16 डिसेंबर 2017 रोजी तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला होता. रेबेकाच्या हत्येप्रकरणी तारिक नावाच्या कॅब चालकाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अटक करण्यात आली होती. 

दोषीचा गुन्हेगारी रेकॉर्ड होताएजन्सीच्या अहवालानुसार, तारिकचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड होता. छळ आणि चोरीच्या आरोपाखाली त्याला यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली होती. असे असूनही तो उबर कॅब चालक म्हणून काम करत होता. दूतावासाने वापरावयाच्या वाहनांमध्ये उबर कॅबचा समावेश नव्हता, असेही अहवालात म्हटले आहे. मात्र, रेबेकाच्या मृत्यूनंतर दूतावासातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचवेळी रेबेकाच्या हत्येला 5 वर्षे उलटून गेल्यानंतरही तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कोर्टात रेबेकाच्या आईने सांगितले की, हे आमच्यावर आलेले दुःख कुणावरही जाऊ नये, आता फक्त असंच वाटतं आहे. त्या दिवशी रेबेकाने सेफ्टी अलार्म लावला असता तर ती वाचू शकली असती असे पुढे आई म्हणते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUberउबर