मोबाईल नेण्यास अडवल्याने पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर फेकून मारलं!

By रवींद्र देशमुख | Updated: October 5, 2023 19:31 IST2023-10-05T19:31:06+5:302023-10-05T19:31:42+5:30

ज्योती मंजुनाथ शिंदे असे जखमी महिलेचे नाव

A gas burner was thrown on his wife's face for stopping her from taking her mobile phone! | मोबाईल नेण्यास अडवल्याने पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर फेकून मारलं!

मोबाईल नेण्यास अडवल्याने पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर फेकून मारलं!

रवींद्र देशमुख, सोलापूर: घरातील मोबाईल घेऊन जाण्यास अडवल्याबद्दल पतीनं पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर असलेली कॅरीबॅग फेकून जखमी केले. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मीनगर, हत्तुरे वस्ती येथे हा प्रकार घडला. ज्योती मंजुनाथ शिंदे (वय- ३५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

हत्तुरे वस्ती येथील लक्ष्मीनगर येथे फिर्याद ज्योती व पती मंजुनाथ शिंदे हे राहतात. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास दोघा पती-पत्नीमध्ये मोबाईल बाहेर नेण्यावरुन भांडणास सुरुवात केली. या प्रकारानं मंजुनाथ याने चिडून घरात गॅसचे बर्नर व लोंखडी स्टँड असलेली कॅरीबॅग उचलली आणि ज्योती यांच्या चेहऱ्यावर मारल्याने ज्योती जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ज्योती यांनी फिर्याद दिल्याने पतीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास बहिर्जे करीत आहेत.

Web Title: A gas burner was thrown on his wife's face for stopping her from taking her mobile phone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.