शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८ लाखांची खंडणी मागणाऱ्या आठ जणांच्या टोळीस अटक, असा टाकला छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 20:42 IST

एरंडोल : ऑईल मिल संचालकांकड मागितले पैसे

एरंडोल जि.जळगाव  :  बालाजी ऑइल मिलच्या संचालकांकडे आठ लाखांची खंडणी मागण्यासाठी आलेल्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. सोमवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शशिकांत कैलास सोनवणे (३९,  द्वारका नगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (२०, रा. जे. टी. एस. रोड, भुसावळ), पत्रकार मिलिंद प्रकाश बोदडे (३६), आकाश सुरेश बोदडे (२२, दोघे रा. तळणी,  जिल्हा बुलढाणा), गजानन आनंदा बोदडे(३२),  साक्षी राजू तायडे (३२, दोघे रा. कुलकर्णी प्लॉट, भुसावळ) आदी आठ जणांचा समावेश आहे.   एरंडोल येथील बालाजी मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना पुरुष व महिलेने मिलबाबत तक्रार करण्याची धमकी देत त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणी मागितली होती. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील तीन जण सोमवारी ऑईल मिलमध्ये खंडणी घेण्यासाठी येणार होते. तिथे पोलिसांना सापळा लावला. टोळीतील दोन महिलांसह तीन जण ऑइल मिलमध्ये आले व चार जण बाहेर थांबले. 

अनिल काबरा यांच्याकडून महिलेने एक लाख रुपयांची खंडणी घेताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. इकडे छाप्याची चाहूल लागल्याने बाहेर उभ्या असलेल्या चारही जणांनी दुचाकीवर जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. या छाप्यात एक लाख रुपये रोख, आठ मोबाईल दोन दुचाकी, एक कार असा एकूण दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन मुली अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल,  हेकॉ. अनिल पाटील, पोना. मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव