शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:53 IST

तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

डोंबिवली : सर्वसामान्य नागरिकांकडून भिशीच्या नावाने पैसे, गहाण ठेवलेले व बनविण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या सोहनसिंह चैनसिंह दसाना (५२) या भामट्या सुवर्णकाराला रामनगर पोलिसांनीराजस्थान येथून अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून सोहनसिंह आपल्या घरातील एका रूममध्ये बाहेरून कुलूप लावून लपून राहत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनसमोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान होते. नागरिकांकडून विश्वासाने दागिने घेऊन त्या मोबदल्यात कर्ज देतो सांगत, तसेच दागिने बनविण्यासाठी आगाऊ रकमा घेऊन, कोणतेही दागिने बनवून न देता तसेच दागिने व रक्कम घेऊन सहा महिन्यांपूर्वी सोहनसिंह पसार झाला होता. त्याने भिशीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पैसे घेतले होते. अचानक त्याच्या दुकानाला कुलूप लागल्याने जेव्हा गुंतवणूकदारांनी सोहनसिंहला फोन करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचा फाेन सातत्याने बंद असल्याचे आढळून आले. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित १६ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सोहनसिंह विरोधात तक्रार दिली होती. गुंतवणूकदारांची एकूण ३१ लाख ५३ हजार २२० (रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने) फसवणूक झाली होती. 

पत्नीने दिली खोटी माहिती- पोलिसांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान येथील थुरावड बरकडा की भागल या गावात पोहोचले. सोहनसिंहच्या घराचा ठावठिकाणा शोधत पोलिस त्याच्या घरी पोहोचले. पण सहा महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात नाहीत, अशी खोटी माहिती सोहनसिंहच्या पत्नीने पोलिसांना दिली. 

- सोहनसिंह हा घरातच असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. तो घरातील एका खोलीला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये लपून राहतो, असेही समजले होते. अखेर पोलिसांनी घरात घुसून कुलूप तोडून त्याला ताब्यात घेतले. - या गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, नीलेश पाटील, निसार पिंजारी यांचे पथक नेमले होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसthaneठाणे