शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या अव्वाच्या सव्वा मागणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पत्नी थेट पोलिसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 23:27 IST

पोलिसांनी तक्रारीनुसार सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : सावकाराने २८ लाखांची अवाजवी मागणी केल्याने कुरुंगवडी येथील सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३, रा. कुरंगवडी, ता. भोर) यांनी शेतातील झाडाला दोरीचा फास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर) यांचे विरुध्द फिर्याद वैशाली सतीश शिळीमकर यांनी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली.  याप्रकरणी राजगड पोलिसांनी तक्रारीनुसार सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. 

राजगड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अमृत महादेव शिळीमकर याने कुरंगवडीत येथील सतीश शिळीमकर यांना कर्ज दिले होते. सावकारीचा विळखा पडल्याने तालुक्यातील अनेक असह्य कर्जदार मेटाकुटीस येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला आहे. सावकारी कर्जामुळे या तरूणाने आत्महत्येसारखा भयंकर प्रकार केल्याने या प्रकाराकडे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सतीश शिळीमकर यांनी त्याच्या कुरंगवडी येथील शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतला होता. या वेळी त्यांच्या पँटच्या डाव्या खिशात लिहलेली चिठ्ठी मिळून आली.त्यात सतिश याने तांभाड येथील अमृत शिळीमकर यांचे कडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजासह २८ लाखांची मागणी करीत आहेत. २८ लाख रुपयांची मागणी करून पैसे परत दिले नाही तर जमिन नावावर करून दे अशी मागणी करीत असलेमुळे त्याचे व्याजाने घेतलेल्या पैशाचे मागणीला, धमकीला व जाचहाटाला कंटाळुन पती सतिश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्या केली असल्याचे सतिश यांची पत्नी वैशाली यांनी त्यांचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पुढील तपास पो नि सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. नि. संजय सुतनासे तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी