दोन गटात तुंबळ हाणामारी; तिघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल
By रोहित टेके | Updated: May 5, 2023 13:38 IST2023-05-05T13:37:32+5:302023-05-05T13:38:38+5:30
याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून शुक्रवारी(दि.५) पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन गटात तुंबळ हाणामारी; तिघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : किराणा दुकानात वस्तू घेण्यासाठी गेलेल्या एका मुलीची दुकानदाराने डोळा मारून असभ्य वर्तणूक करीत छेड काढल्याच्या रागातून दोन गटातील पाच जणांनी एकमेकास शिवीगाळ करीत लाकडी दांड्यासह धारदार वस्तूने तुंबळ हणामारी करून एकमेकांच्या हातावर, पाठीवर, डोक्यात जखमी केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात गुरुवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून शुक्रवारी(दि.५) पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत दोन्ही गटातील तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.