कल्याणमध्ये पैशांसाठी हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
By मुरलीधर भवार | Updated: September 27, 2023 16:43 IST2023-09-27T16:43:22+5:302023-09-27T16:43:42+5:30
आरोपीनी कॅशियरच्या खिशातून जबरदस्तीने १२ हजार काढले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये पैशांसाठी हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण : पैशासाठी एका रेस्टारंटमध्ये कॅशियरला मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. आरोपीनी कॅशियरच्या खिशातून जबरदस्तीने १२ हजार काढले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिमेतील बिर्ला रोड परिसरात डिवाईन फाईन वाईन रेस्टारंट आणि बार हे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये सूरजकुमार चौपाल हा २४ वर्षीय तरुण कॅशियरचे काम करतो. मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास दत्ता जाधव त्याचा भाऊ सिद्धेश जाधव आणि रोहित नावाचा तरुण तरुण हे तिघे हॉटेलमध्ये आले. ते जोरजोराने ओरडत होते. हॉटेलच्या मालक कुठे आहे. त्याला इकडे बोलावा. कैशियर सुरज कुमार याने त्यांना विनंती केली. हळू बोला. तुमचे काय काम आहे. तिघेही कैशिअरकडून पैसे मागत होते.
सूरज कुमार याने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी सूरजकुमारला मारहाण केली. हॉटेलची तोडफोड केली. सूरजकुमार याच्या खिशातून १२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना सिसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. या प्रकरणी सिद्धेस जाधव आणि रोहित कागडा यांना अटक केली आहे.