वसूल केलेल्या पैशांच्या अपहारप्रकरणी सावदा मर्चंट पतपेढीच्या तत्कालीन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 22:12 IST2023-04-12T22:11:53+5:302023-04-12T22:12:02+5:30
पतपेढीचे मुख्य अवसायक राहुल प्रकाश मुजुमदार यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र वाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसूल केलेल्या पैशांच्या अपहारप्रकरणी सावदा मर्चंट पतपेढीच्या तत्कालीन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
सावदा : कर्जदाराकडून वसूल केलेल्या साडेआठ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सावदा मर्चंट पतपेढीचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (४०) यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाणी हे सावदा मर्चंट सोसायटीमध्ये मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी वेगवेगळ्या कर्जदारांकडून साडेआठ लाख रूपये जमा करून ते सोसायटीत न भरता स्वत: वापरले. या बदल्यात त्यांनी संबंधित कर्जदारांना बनावट पावत्या दिल्या होत्या. हा सर्व प्रकार सन २०१२ ते २०२१ च्या दरम्यान घडला होता.
पतपेढीचे मुख्य अवसायक राहुल प्रकाश मुजुमदार यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र वाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.