सीवूडच्या त्या आश्रम चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, एका मुलीने दिली लैंगिक शोषणाची तक्रार
By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 12, 2022 23:19 IST2022-08-12T23:18:52+5:302022-08-12T23:19:33+5:30
Crime News: सीवूड येथे बेकायदा चालणाऱ्या आश्रमावर कारवाई केल्यानंतर तिथे एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करून आश्रम चालकाला अटक करण्यात आली आहे.

सीवूडच्या त्या आश्रम चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, एका मुलीने दिली लैंगिक शोषणाची तक्रार
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - सीवूड येथे बेकायदा चालणाऱ्या आश्रमावर कारवाई केल्यानंतर तिथे एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करून आश्रम चालकाला अटक करण्यात आली आहे.
सीवूड सेक्टर 48 येथे विनापरवाना चालणाऱ्या आश्रमवर नुकतेच महिला व बालविकास विभागाने कारवाई केली होती. त्याठिकाणी आश्रयाला असलेल्या 45 मुला मुलींची सुटका करून त्यांना उल्हासगर येथील सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत एका अल्पवयीन मुलीने तिचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दिली आहे. त्याद्वारे आश्रम चालक राजकुमार येशुदासन (50) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तर इतरही मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत का ? याप्रकरणी सुटका केलेल्या बालकांकडे महिला व बालकल्याण विभाग अधिक चौकशी करत आहे.