उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: October 25, 2022 11:40 IST2022-10-25T11:40:18+5:302022-10-25T11:40:45+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारत असून इमारतीवर रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले.

A case has been registered against a youth who celebrated Diwali by firing a rocket on a building in Ulhasnagar | उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

उल्हासनगर : गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारतीवर स्फोटक फटाके रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या एका माथेफिरूवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुदैवाने इमारती मध्ये रॉकेट सोडूनही अप्रिय घटना घडली नसून पोलीस माथेफिरू तरुणांचा शोध घेत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारत असून इमारतीवर रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले. याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. रॉकेट इमारतीवर सोडल्याने, मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रॉकेट इमारतीवर सोडल्याने एकच खळबळ उडुन संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी सोशल मिडीयावर झाली. अखेर पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. 

हिरापन्ना इमारतीच्या दिशेने स्फोटक असलेले रॉकेट सोडून रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण केला. अखेर इमारतीं मधील नवीन मुलतानी यांच्या तक्रारीवरून एका अनोळखी इसमाचे विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८५, २८६, ३३६ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A case has been registered against a youth who celebrated Diwali by firing a rocket on a building in Ulhasnagar