शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सतर्क महिला प्रवासी अन् मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नाने अल्पवयीन मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:10 IST

अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन भीक मागणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे प्रवासी संघटना, मनसे आमदार राजू पाटील यांची सतर्कता, मुलीला दिले चाईल्ड वेल्फेअर युनिटच्या ताब्यात

डोंबिवली- मुले पळवून नेणाऱ्या टोळीची अफवेमुळे पोलीस यंत्रणा हैराण असतानाच येथील रेल्वे स्टेशनवर मुंबई दिशेकडील रेल्वे ब्रिजवर एक महिला झोपलेल्या मुलीला घेऊन भीक मागत असल्याचा फोटो गुरुवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या मुलीला गुंगी असल्याने ती झोपलेली असून त्या महिलेची ती मुलगी नाही अशी शंका वाटली म्हणून एका जागरूक महिलेने तो फोटो समाज माध्यमांवर शेअर केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यानुसार उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी त्याबाबत लोहमार्ग पोलीस, आरपीएफ, आणि मनसे आमदार राजू पाटील यांना त्याबाबत माहिती दिली. अल्पावधीतच संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या मुलीला चाईल्ड वेल्फेअफ युनिटच्या ताब्यात दिले.

पोलिसांची कारवाई रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अरगडे यांना एका महिलेने समाज माध्यमांद्वारे त्या भीक मागणाऱ्या महिलेचा आणि गुंगीत असणाऱ्या मुलीचा फोटो टाकला. महिला आणि ती मुलगी यांच्यात साधर्म्य नसल्याने ती मुलगी नेमकी त्या महिलेकडे कशी आली. वेगळा काही प्रकार तर नाही ना याचे प्रसंगावधान राखून अरगडे यांनी रेल्वे पोलीस, मनसेचे आमदार पाटील यांना त्याबाबत माहिती दिली, पाटील यांनीही त्यानुसार लगेच कार्यकर्त्यांना सांगून घटनास्थळी जाण्यास सांगितले. तोपर्यंत अरगडे यांनी त्याबाबत तक्रार घेण्यास सांगितले, आणि काही वेळात पोलीस कर्मचारी पकडायला गेले तोपर्यंत ती महिला पळून गेली होती.

तात्काळ आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि त्या भिकारी महिला व मुलीला ताब्यात घेतले, आता ते प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने कडून जीआरपीकडे वर्ग केले असून त्या महिलेला घेऊन गेले आहेत, त्या भिकारी महिलेवर बाल भिक्षा गुन्हा दाखल करुन आरोपी केल्याचे सांगण्यात आले. ही मुलगी माझी नात आहे असे आरोपीने सांगितले असून त्यानूसार पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्या लहान मुलीला चाईल्ड वेल्फेअर युनिटच्या ताब्यात दिले आहे. पुढील अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्या महिलेने जागरुकता दाखवून फोटो काढून पाठवले त्या माया कोठावदे आणि मला फोटो पाठवून कळवले त्या सायली शिंदे या दोघींसह आमदार पाटील यांची मदत झाल्याचे अरगडे यांनी समाज माध्यमांवर त्या सगळ्यांचे आभार मानले. म्हंटले.

टॅग्स :MNSमनसेrailwayरेल्वे