शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार

By अजित मांडके | Updated: February 23, 2023 15:47 IST

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे

ठाणे : मुख्यमंत्री सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाणे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे. असे खासदार राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना कळवले होते. या पत्रात म्हटल्याप्रमाणे हा कट खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्ता असलेल्या राजा ठाकूर यांना सांगितले असल्याचे त्यामध्ये नमूद केलेले होते. यामुळेच खासदार शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केल्यानंतर राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी बुधवारी तक्रार दाखल केली . या तक्रारीची दखल घेत कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.संजय राऊत यांच्या विरोधात भादवी कलम 211,153(अ),501,504, 505(2) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय. खासदार शिंदे यांची बदनामी केली,समाजात तेढ,वैमनस्य निर्माण करणे,खोटे पत्र देणे म्हणून तक्रार केली होती याच अंतर्गत गुन्हा केलाय दाखल झाला आहे. राऊत बेताल वक्तव्य करीत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काही ही बडबडत असतात,खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मालिन करण्याचे आक्षेपार्ह विधान करीत आहेत अशी टीका माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलीय..

ठाणे पोलिसांनी नोंदवला राऊत यांचा जबाब

बुधवारी सकाळी ठाणे पोलिसांनी इगतपुरी येथे जाऊन संजय राऊत यांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जावर त्यांचा जबाब नोंदवला असून बुधवारी रात्री मीनाक्षी शिंदे यांच्या आलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे.

राजा ठाकूर यांच्या कुटुंबीयांनी ही दिली आहे तक्रार

या पत्रामध्ये संजय राऊत यानी नमूद केल्याप्रमाणे राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी ही मंगळवारी रात्री लेखी तक्रार कापूर बावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यासोबत आमची बदनामी झाली असल्याचे सांगत न्यायालयात दावा देखील दाखल करणार असल्याचे जाहीर केलेले आहे.

संजय राऊत यांना वेड लागलंय

संजय राऊत यांना वेड लागला असल्याचा दावा  प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला होता, त्यांना रोज सकाळी बडबड करण्याची सवय असल्याचा टोला देखील म्हस्के यांनी हा तक्रारीचे पत्र दिल्यानंतर बोलताना लगावला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीShrikant Shindeश्रीकांत शिंदे