उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेलमध्ये राजस्थान येथील एक व्यापारी त्याच्या प्रेयसीसोबत दोन दिवस थांबला होता. पण, या व्यावसायिकाचा मृतदेह बाथरुमममध्ये सापडला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि व्यावसायिकाच्या कुटुंबाला माहिती दिली.
मृतदेह सापडल्यानंतर, व्यावसायिकाची महिला मैत्रिण तेथून पळून गेली. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. यासोबतच, कुटुंबातील सदस्य आल्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी उघड होतील.
माजी एडीसीपी पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जालोर येथील व्यापारी नीलेश भंडारी (४४) हे दोन दिवसांपूर्वी चिन्हाट येथील सॅफ्रॉन हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्यासोबत एक महिला होती. त्या व्यावसायिकाने २०८ क्रमांकाची एक रुम बुक केली होती, त्या महिलेला व्यापाऱ्याने पत्नी असल्याचे सांगितले होते. मंगळवारी रात्री निलेशचा मृतदेह बाथरूममध्ये कपड्यांशिवाय आढळला. ही माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना महिलेने दिली. चिन्हाट पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नीलेशचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, आकांक्षा तिची पर्स आणि डायरी सोबत त्याच ठिकाणी घेऊन गेली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यापाऱ्याच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत. निलेशची पत्नी डिंपल यांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्या महिला मैत्रिणीचा शोध सुरू आहे.