दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त...
By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 18:28 IST2023-03-27T18:27:53+5:302023-03-27T18:28:07+5:30
शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली घटना

दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त...
विलास जळकोटकर, सोलापूर: हल्ली भांडण करायला कुठलंही कारण पुरेसं आहे. यामुळे जीवावर बेतण्याइतपत मारहाणीचे प्रकार घडत आहे. शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास किरकोळ कारणावरुन भांडणं झाली आणि दोघा अनोळखींनी तरुणाच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. डोकं रक्तानं माखलं. आरिफ हजरत पटेल (वय- ३६) असे जखमीचे नाव आहे.
सोमवारी पोलिसांना पोलिसांना खबर मिळाली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास रुग्णवाहिकेद्वारे लादेन शेख यांनी त्याला उपचारासाठी दाखल केले. रात्रीची वेळ असल्याने मंगळवार बाजार परिसरात कोणाचाही वावर नसतो. येथे नशापाणी करण्यासाठी अनेकांचा वावर असतो. यातील जखमी हा तेथे गेलेला असताना अनोळखी दोघांनी अज्ञात कारणावरुन या तरुणाच्या डोक्यात बाटली फोडली. मारहाणीच्या कारणाचा व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.