शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घरापासून काही अंतरावर ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नागपड्यातील घटनेनं परिसर सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 06:29 IST

नागपाडा परिसरात ५ वर्षीय मुलगी शनिवारी रात्री घरापासून काही अंतरावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत पळ काढला.

मुंबई : नागपाडासारख्या संवेदनशील ठिकाणी ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगी मानसिक धक्क्यात असल्याने तिच्याकडून आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळाली नसताना नागपाडा पोलिसांच्या स्पेशल ३५ जणांच्या टीमने अवघ्या सहा तासांत आरोपीला नालासोपारा येथून पकडले आहे. 

नागपाडा परिसरात ५ वर्षीय मुलगी शनिवारी रात्री घरापासून काही अंतरावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत पळ काढला. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका होताच त्रास होत असल्याचे सांगितले. आईने मुलीला तत्काळ नायर रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ नागपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर स्वतः ऑन फिल्ड उतरले.

३५ जणांच्या ५ टीम तयार करत नागपाडासह मुंबईचा कोनाकोपरा पिंजून काढला.  पहाटेच्या सुमारास एका सीसीटीव्हीमध्ये एका तरुणाचा पुसटसा चेहरा पथकाच्या हाती लागला. पुढे हाच धागा पकडून पोलिस त्याच्या मामापर्यंत पोहोचले. मामाकडून त्याच्या घराचा पत्ता मिळाला. तेथून तो नालासोपारा येथे असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेतली व सलग सहा तास सुरू असलेल्या मेहनतीला यश आले. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस