१० वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४९ वर्षीय संशयितास अटक
By काशिराम म्हांबरे | Updated: May 3, 2023 12:55 IST2023-05-03T12:54:46+5:302023-05-03T12:55:21+5:30
सोमवारी रात्री घडला होता किळसवाणार प्रकार

१० वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४९ वर्षीय संशयितास अटक
काशीराम म्हाबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: आपल्याच इमारतीत राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ४९ वर्षीय संशयितास अटक केली. सदर प्रकार हा सोमवारी (१ मे) रात्री घडला होता. घडलेल्या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने दोन दिवसानंतर म्हापसा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. केलेली तक्रार म्हापसा पोलिसांनी पॉस्को व बाल कायद्यातंर्गत नोंद करून घेतली होती. करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तपास कार्य आरंभण्यात आले होते. केलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर म्हापसा पोलिसांनी नंतर संशयितास अटक केली. सध्या या प्रकरणातील तपास कार्य निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी असाच आणखीन एक प्रकार कोलवाळ पोलीस स्थानकावर घडला होता. लग्नास नकार देणाऱ्या युवतीचे अश्लील फोटो एका युवकाकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर त्या युवकाला अटक करण्यात आली होती.