पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि ४) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी अभयकुमार देबेंद्रनाथ परिडा (वय ३८, म्हातोबा मंदिरा जवळ, काळाखडक झोपडपट्टी) याला अटक केली आहे. याबाबत माहिती अमली पदार्थांचा गैरव्यवहार करणाऱ्यांची महिती काढून कारवाई करण्याबाबत गस्त सुरू असताना पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांना एक व्यक्ती गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्यांनी या व्यक्तींकडे चौकशी करत तपासणी केल्यावर पांढऱ्या पोत्यात ६ किलो २७३ ग्रॅम वजनाचा व ९२ हजार पाचशे रुपयांचा गांजा आढळून आला. सदरची कामगिरी वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार वसंत मुळे यांच्यासह हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर,अशोक गारगोट, रमेश भिसे, बाळासाहेब दौंडकर, तुकाराम घुगे, दादा धस यांच्या पथकाने केली.
वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ९२ हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:52 IST
अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला.
वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ९२ हजारांचा गांजा जप्त
ठळक मुद्दे६ किलो २७३ ग्रॅम वजनाचा व ९२ हजार पाचशे रुपयांचा गांजा