शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ; माओवादी संबंध प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:25 IST

न्यायालयाने सोमवारी चारही आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ दिली. 

ठळक मुद्देवरवरा राव भूमिगत माओवाद्यांशी संपर्कात  सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशीनंतर आॅगस्टमध्ये अटक आरोपींचा रोल स्पष्ट

पुणे : एल्गार परिषदेचे अनुषंगाने दाखल गुन्ह्यात अटक झालेले कवी वरवरा राव हे भूमिगत माओवाद्यांशी संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासत निष्षन झाले आहे. तर सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्या माओवाद्यांशी थेट संबंध नसला तरी ते राव त्यांच्या संपर्कात आहेत, असे समोर आले आहे. त्यामुळे या सर्वांचा तपास होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सोमवारी चारही आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ दिली.  सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या वरवरा राव, सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांना पहिल्यांदा अटक केलेल्याला २५ नोव्हेंबरला ९० दिवस पूर्ण होत आहे. त्या आत दोषारोपत्र दाखल न केल्यास त्यांना जामीन मिळू शकला असता. त्यामुळे आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास युएपीए कलमानुसार आणखी ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शुक्रवारी ( २३ नोव्हेंबर) पोलिसांनी केली होती. त्यावर दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी ९० दिवस मुदतवाढीचा अर्ज मंजुर केला.          सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशीनंतर आॅगस्टमध्ये अटक आरोपींचा रोल स्पष्ट झाला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याची वेळोवेळी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आरोपींच्या घरांची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात डेटा जप्त करण्यात आला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येत असून कागदपत्रांच्या क्लोन कॉपी अद्याप मिळालेल्या नाहीत. या गुन्ह्यात आरोपींच्या सहभागाबाबत सखोल चौकशी करायची आहे. त्यासाठीच पोलीस कोठडीचे अधिकार देखील राखीव ठेवण्यात आले आहे. आरोपी तपासास सहकार्य करीत नसून कोठडीत मारहाण केली असा खोटा आरोप पोलिसांवर करीत आहेत, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अ?ॅड. उज्वला पवार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र