मुंब्रा येथून ९ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:09 IST2019-01-28T16:08:03+5:302019-01-28T16:09:27+5:30
९ लाख रुपयांचा २८. ५०० किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

मुंब्रा येथून ९ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत
ठाणे - मुंब्रा शीळ डायघर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील ९ लाख रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ९ लाख रुपयांचा २८. ५०० किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेला शिळफाटा येथील फेमस हॉटेलसमोरील रस्त्यावर एक इसम अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमोल राजू हिरवे याला २८. ५०० किलो ग्रॅम वजनाच्या गांज्यासह अटक करण्यात आली. नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणार अमोल हा आपल्या ज्युपिटर या दुचाकीवरून आला होता. त्याची दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम (८)(क), २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.