रहाटणी : वाकड परिसरात धुळवडी निमित्त सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर तसेच चौकामध्ये नागरिक, महिला, वाहन चालकांवर रंगाचे फुगे फेकत हुल्लडबाजी करणाऱ्या 84 जणांना आज गुरुवारी ताब्यात घेण्यात आलेले आहे. ही कारवाई वाकडपोलिसांनी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धुळवडीचा बंदोबस्त असल्याने हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, वाकड पोलीस ठाण्यातील ९ टीम तयार करण्यात आले होते. त्यात ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी आणि महिलांवरती रंग टाकणारी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ८४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे सतीश माने यांनी सांगितले.
रंगाचा बेरंग करणारे ८४ हुल्लडबाज पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 14:46 IST
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर तसेच चौकामध्ये नागरिक, महिला, वाहन चालकांवर रंगाचे फुगे फेकत हुल्लडबाजी करणाऱ्या 84 जणांना आज गुरुवारी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
रंगाचा बेरंग करणारे ८४ हुल्लडबाज पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्देवाकड पोलिसांची धडक कारवाई