शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

Digital Rape : अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:12 IST

Digital Rape Case : 'डिजिटल रेप' या शब्दाचा अर्थ हातची बोटे किंवा पायाची बोटे वापरून स्त्री किंवा मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. डिसेंबर २०१२ पर्यंत डिजिटल रेप हा बलात्काराच्या कक्षेत आला नव्हता

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षांहून अधिक काळ कथित 'डिजिटल' बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका पोलीस प्रवक्त्याचा हवाला देऊन सांगितले की, या व्यक्तीवर गेल्या सात वर्षांत १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप आहे.'डिजिटल रेप' या शब्दाचा अर्थ हातची बोटे किंवा पायाची बोटे वापरून स्त्री किंवा मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. डिसेंबर २०१२ पर्यंत डिजिटल रेप हा बलात्काराच्या कक्षेत आला नव्हता. तथापि, निर्भया सामूहिक बलात्कारानंतर, लैंगिक गुन्ह्याचे वर्गीकरण 'डिजिटल रेप' म्हणून भारतात झाले, ज्यामुळे देशातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. 

व्यक्तीवर डिजिटल बलात्काराचा आरोपपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या पालकासोबत राहते, तिची जवळपास २० वर्षांपासून आरोपीसोबत मैत्री आहे. मुलगी सुरुवातीला तक्रार नोंदवायला घाबरली होती. पण नंतर तिने संशयिताच्या लैंगिक छळाची नोंद करण्यास सुरुवात केली आणि मोठे पुरावे गोळा केले. तिने पालकांना तिला होणारा त्रास सांगितला. नंतर तक्रार नोंदवण्यासाठी पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला.स्केच आर्टिस्टसह शिक्षक असलेल्या संशयिताला रविवारी स्थानिक सेक्टर 39 पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे), ५०६ (धमकावणे) अंतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.सेक्टर 39 चे एसएचओ राजीव कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, "मुलगी येथे तिच्या पालकासोबत राहते, ती जवळपास 20 वर्षांपासून आरोपीला मित्र म्हणून ओळखत आहे. पालकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती."न्यायालयीन कोठडीत आरोपीत्याच्या अटकेनंतर, आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.भारतात डिजिटल बलात्काराचा आरोप कुणावर असल्यास, गुन्हेगारांवर आता आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. परंतु डिजिटल बलात्काराच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अजूनही देशात तुलनेने कमी आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक