खरेदी करताना महिलेचे ८० हजार चोरी; गोरेगाव पोलिसात तक्रार

By गौरी टेंबकर | Updated: April 8, 2023 17:11 IST2023-04-08T17:11:25+5:302023-04-08T17:11:55+5:30

परमार या कांदिवली पूर्वजा ठाकूर विलेज परिसरात पतीसोबत राहतात. त्या ६ एप्रिल रोजी कलासंगम दुकानात खरेदीला गेल्या होत्या.

80,000 stolen from a woman while shopping; Complaint in Goregaon Police | खरेदी करताना महिलेचे ८० हजार चोरी; गोरेगाव पोलिसात तक्रार

खरेदी करताना महिलेचे ८० हजार चोरी; गोरेगाव पोलिसात तक्रार

मुंबई - गोरेगावच्या स्टेशन रोड परिसरात साडी खरेदी करण्यासाठी मीनादेवी परमार (४३) पतीसोबत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे ८० हजार रुपये चोरी करण्यात आले. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिसांना तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमार या कांदिवली पूर्वजा ठाकूर विलेज परिसरात पतीसोबत राहतात. त्या ६ एप्रिल रोजी कलासंगम दुकानात खरेदीला गेल्या होत्या. त्यानंतर तिथून आशा कटपीस साडी सेंटर या ठिकाणी लेडीज पेटिकोट घेण्यासाठी गेल्या आणि नंतर सामान खरेदी करून कारमध्ये बसत असताना त्यांचे पर्समध्ये ठेवलेले ८० गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पुन्हा त्यांनी दुकानात जाऊन तिथले सीसीटीव्ही फुटेज पडताळणी मात्र त्यात काहीही दिसले नाही. अनोळखी व्यक्तीच्या विरोधात त्यांनी गोरेगाव पोलिसांकडे तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: 80,000 stolen from a woman while shopping; Complaint in Goregaon Police