शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेजारीच राहणाऱ्या नराधामाने दोन बहिणींवर केले लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:46 IST

एकीकडे  कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतासह राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.  मात्र एकीकडे  कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबईत मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील व्हीबी नगरमध्ये एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या ८० वर्षाच्या व्यक्तीने दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यासंबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपीचे कुटुंब उत्तर प्रदेशमधील आहे. आरोपीने लॉकडाऊनच्या पूर्वीच आपल्या कुटुंबाला उत्तर प्रदेशात पाठवले होते. त्यानंतर त्याला देखील गावी जायचे होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे त्याला गावी जाता आले नाही. घरी एकटाच राहत असल्यामुळे पीडित कुटुंबाने माणुसकीच्या नात्याने आरोपीला जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे जेवण देण्यासाठी १२ वर्षाची आणि ७ वर्षाची मुलगी आरोपीच्या घरी जात होत्या. मात्र आरोपीने याचाच फायदा घेत दोन्ही मुलींवर लैगिक अत्याचार करत होता.

आरोपीला जेवण देण्यासाठी गेल्यानंतर एकदा खूप उशीर झाल्यानंतरही त्या घराबाहेर आल्या नव्हत्या. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने आरोपीच्या घरात डोकावून पाहिले तर संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शेजाऱ्याने आरडाओरडा करून पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित कुटुंबाला मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस स्थानकात धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या

"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

वंश-धर्माच्या आधारावर फूट पाडणारे स्वतःला राष्ट्रवादी म्हणताहेत; राहुल गांधींचा ट्रम्प-मोदींवर निशाणा

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस