शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साठ कोटी कर्जाच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाला ८० लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 19:17 IST

या बांधकाम व्यावसायिकाचे येरवड्यातील आळंदी रोड येथे कार्यालय असून पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर येथे गृहप्रकल्प आहे़.

ठळक मुद्देयाप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या विविध प्रकल्पासाठी ६० लाख रुपयांचे कर्ज खासगी कंपनीकडून मिळवून देतो, असे सांगून रजिस्ट्रेशनसाठी पैसे घेऊन ८० लाख रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चेन्नई, त्रिवेंदम, कर्नाटकातील अमराविले येथील के़. व्ही़. मधान, ए़. हरी गोपाळकृष्णन, राजकुमार चंद्रशेखरन, ए़ कुमारन व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी संजय मुन्नलाल अगरवाल (वय ५२, रा़ टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय अगरवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत़. त्यांचे येरवड्यातील आळंदी रोड येथे कार्यालय असून पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर येथे गृहप्रकल्प आहे़. या प्रकल्पांसाठी त्यांनी खासगी वित्त संस्थेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांना जून २०१७ मध्ये काही जणांनी संपर्क साधून बांधकाम प्रकल्पांसाठी ६० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले़. त्यानुसार त्यांनी त्यांच्याबरोबर करार केला़. कर्ज मिळविण्यासाठी मोबीलायझेशन म्हणून ८० लाख रुपये आगाऊ घेतले़. त्यांनी केलेल्या कराराचे अमराविले येथील सबरजिस्टर कार्यालयात २० हजार रुपये नोंदणी फी भरुन रजिस्टर केले़. त्यानंतर त्यांनी ६० कोटी रुपयांच्या ६० लाखांची प्रॉमेसरी नोट बनवावी लागेल असे सांगितले़.त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या ८० लाख रुपयांतून ते प्रॉमेसरी नोट तयार करणार होते़. यानंतर आपल्याला कर्ज मिळेल, म्हणून ते वाट पहात राहिले़. परंतु, कर्ज न मिळाल्याने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांचे मोबाईल बंद आढळून आले़. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर प्रत्यक्षात त्यांनी केवळ १० लाख रुपयांची प्रॉमेसरी नोट बनविली व इतर तीन प्रॉमेसरी नोटची नोंदणी न केली नाही़.  तसेच ६० लाख रुपयांचा डी़डी़ न काढता अगरवाल यांच्या ८० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे़. पोलीस निरीक्षक अशोक सायकर अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीbusinessव्यवसाय