चार सहकारी संस्थांकडून शासनाची ८ कोटींची फसवणूक उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 18:24 IST2019-12-27T18:20:29+5:302019-12-27T18:24:05+5:30
संस्थांकडून बनावट कागदपत्रे व देयके सादर करून फसवणूक

चार सहकारी संस्थांकडून शासनाची ८ कोटींची फसवणूक उघडकीस
पूर्णा : विविध उद्योगांसाठी शासनाने दिलेल्या दीर्घकालीन कर्जाच्या 8 कोटी 30 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार व अपव्यय करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दि 27 डिसें रोजी चार सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सुरवाडी येथील प्रेरणा मागासवर्गीय सहकारी संस्था, परिवर्तन मागासवर्गीय सहकारी संस्था, रमाबाई मागासवर्गीय सहकारी संस्था व रामोजी मागासवर्गीय सहकारी संस्थानी महाराष्ट्र शासनाकडून दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले होते. मात्र संस्था चालकांनी कर्जाच्या रकमेचा योग्य वापर केला नाही. तसेच बनावट कागदपत्रे व देयके सादर करून खोटा दस्तावेज खरा असल्याचे भासवले. यातून शासनाने मंजूर केलेल्या 15 कोटी 25 लाख रुपयांपैकी जवळपास 8 कोटी 30 लाख रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कृष्णा कवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी संस्थेचे आत्तमराव यशवंत वाटोडे, विनोद बाबाराव बेकटे, विश्वनाथ नारायण घोडके, यशवंत वाटोडे, गौतम यशवंत वाटोडे, रामप्रसाद काळे यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि सुभाष राठोड हे करीत आहेत