शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येडगावच्या हॉटेलमधून ७५ हजारांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:15 IST

येडगाव येथील आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचा दरवाजा तोडून ७५ हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली

नारायणगाव : येडगाव येथील आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचा दरवाजा तोडून ७५ हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून हा चोर दुसरा-तिसरा कोणी नसून वेटरनेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेटरकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी ६० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी दिली.येडगाव हद्दीत १३ डिसेंबर २०१८ रोजी ही मध्यरात्री १२ नंतर ते सकाळी ७ वाजण्याच्यादरम्यान बारचा मुख्य काचेचा दरवाजा उघडून त्यातील रोख रक्कम ७६ हजार ८६४ रुपये चोरून नेले होते, याबाबत आयव्ही फॅमिली रेस्टॉरंट आणि वाईन बारचे मॅनेजर जितेंद्र अशोक गाढवे (वय ३५, रा. आर्वी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याच्याविरोधात त्यावेळी फिर्याद दिली होती.याबाबत घोडे-पाटील यांनी तपास सुरू केला, गुन्हा घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही चेक केले असता ते बंद होते, म्हणून तेथील कामगाराकडे व गोपनीय बातमीदारांकडे अधिक तपास केला असता बारचा वेटर नितीन अशोक दांगट (वय २८, रा. नारायणगाव) याने ही चोरी केल्याचेनिष्पन्न झाले.दांगट यास अटक करून त्याच्या तपासात गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रकमेपैकी ६० हजार रोख हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती घोडे-पाटील यांनी दिली.ही कारवाई जुन्नरच्या पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शननाखाली सहायक पोलीस निरीक्षक घोडे-पाटील, पोलीस नाईक लोंढे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई कोबल, वाघमारे, लोहार यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे