आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 08:49 IST2022-04-27T08:48:26+5:302022-04-27T08:49:10+5:30
याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वेगळ्या कारणासाठी परवानगी घेऊन शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल
मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी २० जणांचा जबाब नोंदविला असून, बहुतांशी साक्षीदार सरकारी कर्मचारी आहेत. त्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जबाबाचाही समावेश आहे. २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापनेची हालचाल सुरू होती, त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ६० दिवस, तर एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप करण्यात आला होता. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वेगळ्या कारणासाठी परवानगी घेऊन शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.