शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेहुल चोक्सीकडून ४० बँकांना ६,७४७ कोटींचा गंडा, ३ गुन्हे; फरार झाल्यानंतर साडेचार वर्षांनी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:23 IST

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, मेहुल चोक्सी याच्या गीतांजली, नक्षत्र आणि गिली या तीन प्रमुख कंपन्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँकेसह ४० बँकांना ६७४७ कोटींचा गंडा घातल्याची नवी माहिती उजेडात आली आहे. या नव्या प्रकरणात शुक्रवारी सीबीआयने तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या आधी २०१८ मध्ये मेहुल चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होता. 

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, मेहुल चोक्सी याच्या गीतांजली, नक्षत्र आणि गिली या तीन प्रमुख कंपन्या आहेत. यापैकी, गीतांजली जेम्स लि. या कंपनीने ५५६४ कोटी ५४ लाख रुपये, नक्षत्र ब्रँडस् लि. या कंपनीने ८०७ कोटी २ लाख रुपये तर गिली इंडिया लि. या कंपनीने ३७५ कोटी ७१ लाख रुपये, असा एकूण ६७४७ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा या बँकांना घातला आहे. 

प्रामुख्याने हिरे, जडजवाहीर यांची खरेदी, त्यांचे डिझाइन्स व व्यवहार यासाठी हे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणांसाठी बँकांनी त्याला कर्ज दिले होते त्या कारणासाठी ते पैसे वापरण्याऐवजी हे पैसे त्याने लंपास करत त्याचा वापर वैयक्तिक करणासाठी केल्याचे दिसून आले. या तिन्ही प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेच्या उपसरव्यवस्थापकांनी २१ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार सीबीआयकडे दिली होती. त्या तक्रारीच्या छाननीनंतर आता सीबीआयने या तिन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या तिन्ही प्रकरणात मिळून मेहूल चोक्सी याच्यासह, धनेश सेठ (संचालक, गीतांजली), कपिल खंडेलवाल (सहअध्यक्ष, गीतांजली), चंद्रकांत करकरे (मुख्य वित्तीय अधिकारी, गीतांजली), अनियथ नायर (संचालक, गिली) यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले आहेत. 

दरम्यान, गेल्याच महिन्यात सेबीने देखील मेहुल चोक्सी याच्यावर गीतांजलीच्या समभागांच्या किमतीत छेडखानी केल्याप्रकरणी १० वर्षांसाठी बंदी घातली असून त्याला पाच कोटींची दंड ठोठावला आहे. जानेवारी २०१८ पासून सीबीआय मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्याचा तपास करत आहे, तर मार्च २०१८ पासून ईडीदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे.  

सध्या अँटिग्वामध्ये मुक्काम मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये घोटाळा केल्याचे उजेडात आले होते.  जानेवारी २०१८ मध्येच तो देश सोडून पळून गेला. सध्या तो अँटिग्वामध्ये आहे. त्यामुळे आता जवळपास साडेचार वर्षांनी नवीन कोणती माहिती पुढे आली?  हा नवा घोटाळा आधी कसा उजेडात आला नाहीत? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी