चाकूचा धाक दाखवून ६५ हजार लुटले, दोघे जेरबंद; एका संशयिताचा शोध

By संतोष भिसे | Updated: December 26, 2023 21:19 IST2023-12-26T21:18:26+5:302023-12-26T21:19:12+5:30

अटक केलेल्यांकडून रकमेचा ऐवज जप्त

65,000 robbed at knifepoint, two jailed; Search for a suspect | चाकूचा धाक दाखवून ६५ हजार लुटले, दोघे जेरबंद; एका संशयिताचा शोध

चाकूचा धाक दाखवून ६५ हजार लुटले, दोघे जेरबंद; एका संशयिताचा शोध

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: काळ्या खणीजवळ एकाचा चाकुचा धाक दाखवून लुटणाऱ्या विकी राजू मोळके (वय २५, रा. माकडवाले गल्ली, सांगली), गणेश हणमंत पवार (वय २०, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली) यांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. तिसरा संशयित विष्णू मुळके याचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अमित बबन माळी (वय ३५, रा. जुना बुधगाव रस्ता, बिरोबा मंदिराशेजारी, सांगली) यांना चाकूचा धाक दाखवून ७५ हजारांना लुटल्याची घटना १३ नोव्हेंबररोजी घडली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. माळी हे लघुशंकेसाठी थांबले असता तिघा संशयितांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व खिशातील १० हजारांची रोकड काढून घेतली होती.

लुटलेली सोनसाखळी सांगलीत शिलंगण चौकात विक्रीसाठी संशयित सोमवारी (दि. २५) आले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महंमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, गजानन चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Web Title: 65,000 robbed at knifepoint, two jailed; Search for a suspect

टॅग्स :Sangliसांगली