शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांची लढवली अनोखी शक्कल, म्हैस देण्याच्या नावाखाली ६५ हजारांची फसवणूक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:03 IST

याप्रकरणी चंद्रदेव यादव यांनी गुरुवारी हंसदिहा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुमका : एकीकडे सरकार सायबर गुन्हे टाळण्यासाठी लोकांना जागरूक करत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. यादरम्यान, झारखंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. म्हैस देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी छोटी रानबहियार पंचायतीच्या आलुबाडा गावातील चंद्रदेव यादव यांची ६५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंद्रदेव यादव यांनी गुरुवारी हंसदिहा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ६२६८६५३३५२  या नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव अशोक कुमार शर्मा असल्याचे सांगत त्याने स्वत: गाई-म्हशींचा व्यापारी असल्याचे सांगितले. तसेच, राजस्थानमध्ये स्वत:ची डेअरी असून संपूर्ण भारतात दुभत्या गायी आणि म्हशींचा पुरवठा करतो, असे सांगितले. यानंतर त्याने व्हिडिओ कॉलद्वारे चंद्रदेव यादव यांना दुभत्या गायी-म्हशी दाखवल्या. यामधील एक म्हैस चंद्रदेव यादव यांना आवडली.

चंद्रदेव यादव यांना आवडलेल्या म्हशीची किंमत ६० हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. यानंतर अशोक कुमार शर्माने त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि डेअरी फार्मचे फोटो चंद्रदेव यादव यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवले आणि पाच हजार रुपये ॲडव्हान्स पाठवण्यास सांगितले. चंद्रदेव यादव यांनीही १० डिसेंबर रोजी फोन पेद्वारे पाच हजार रुपये पाठवले. यानंतर ११ डिसेंबर रोजी फोनपेद्वारे १३०००, २१५००, १७००० आणि ९ हजार रुपये पाठवण्यात आले. कधी म्हशीची किंमत तर कधी विम्याच्या नावावर आणि वाहतुकीच्या नावावर सर्व पैशांची मागणी करण्यात आली. 

६० हजार रुपये दिल्यानंतर अशोकने जीएसटीच्या नावावर आणखी पैसे मागितले असता, आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे चंद्रदेव यादव यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गुरुवारी हंसदिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्यासोबत झालेल्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. चंद्रदेव यादव यांनी अर्जासोबत पोलिसांना त्याच्याशी कॉल झालेले सर्व मोबाईल नंबर, फोन पे व्यवहार, तसेच कथित गुरे व्यापारी अशोक कुमार शर्मा यांनी पाठवलेले त्याचे पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत देखील दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड