शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

BREAKING : ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त, डीआरआयने केली चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 6:02 PM

साडे आठ कोटीची कर चुकवेगिरी 

ठळक मुद्दे न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले ४० टन वजनाच्या १६ कंटेनरमधील सुमारे ६४० टन खारीक जप्त करण्यात आले.याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खारीकाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

खलील गिरकर मुंबई - ओमान मार्गे भारतात आणलेले आणि करचुकवेगिरी केलेले तब्बल ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर महासंचालनालयने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डीआरआयचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.पुलवामा हल्ल्यानंतर १६ फेब्रुवारीपासून भारत पाकिस्तानमधील व्यापारी संबंधावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 200 टक्के कर आकारणी केली जाते. यामधून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानी खारीक ओमानला पाठवण्यात आला व ओमानी खारीक असे दाखवून त्याची भारतात निर्यात करण्यात आली. मात्र, डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार याबाबत चौकशी करण्यात आल्यावर हे बिंग फुटले. न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले ४० टन वजनाच्या १६ कंटेनरमधील सुमारे ६४० टन खारीक जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या खारीकावर २०० टक्के प्रमाणे तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये कर देण्याची गरज होती. मात्र, ते चुकवण्यासाठी हे खारीक ओमान मार्गे पाठवण्यात आले होते. मात्र, डीआरआयच्या सशक्त नेटवर्कमुळे ते जप्त करण्यात आले. याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खारीकाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील व्यापार मर्यादित झालेला असताना अशा प्रकारे फसवणूक व कर चोरी करुन व्यापार करणाऱ्यांविरोधात झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे. या प्रकरणी सीमाशुल्क कायदा 1962 च्या कलम 104, 135(1)ए व बी प्रमाणे गुन्हा नोंदवून इम्रान तेली, इरफान नुरसुमार, मोहनदास कटारिया व सेवक मखिजा या चार आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये आणखी कोणी आंतरराष्ट्रीय माफिया गुंतलेले आहेत का? याची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयArrestअटकPakistanपाकिस्तानMumbaiमुंबई