शेतात छापा टाकून लहान-मोठी ६२४ गांजा अफूची झाडे जप्त

By अण्णा नवथर | Updated: March 15, 2023 14:20 IST2023-03-15T14:20:07+5:302023-03-15T14:20:51+5:30

नेवासा तालुक्यातील प्रकार :स्थानिक गुन्हे शाखेची शाखेची कारवाई

624 large and small ganja opium plants were seized by fields in Nevasa | शेतात छापा टाकून लहान-मोठी ६२४ गांजा अफूची झाडे जप्त

शेतात छापा टाकून लहान-मोठी ६२४ गांजा अफूची झाडे जप्त

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारामध्ये बेकायदेशीर रित्या पिकविलेल्या गांजा व अफूच्या अफूची सहाशे अफूची सुमारे 14 लाख 95 हजार 420 रुपये किमतीची सहाशे चोवीस झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जप्त केले. नेवासे तालूक्यातील शहापुर व देवगांव शिवारामध्ये बेकायदेशिर गांजा व अफुचे शेतीवर छापा टाकून 14,95,420/-रु. किं.ची 624 लहान मोठी गांजा व अफुचीची झाडे जप्त केले.

 नेवासा तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारात बेकायदेशीर रित्या गांजा व अफूची शेती केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारमार्फत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नेवासा तालूक्यातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांच्या शेताची पाहणी केली. पोलिसांनी  प्रथम शहापुर, (ता. नेवासा ) येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे शेतात पहाणी केली असता गव्हाचे शेतामध्ये 2.5 फुट उंचीची दोन व घरा समोर 8 फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसुन आले. पोलिसांनी बाबुराव लक्ष्मण साळवे याचे कब्जातील शेतामधुन 1लाख 11,हजार 420 रूपये किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.

तसेच देवगांव, (ता. नेवासा)  येथे जावुन रावसाहेब भागुजी गिलगिले यांचे शेताची पाहणी केली असता शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले. पोलिसांनी रावसाहेब भागुजी गिलबिले यांच्या शेतातून  13 लाख 84,000 रूपये किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.

    नेवासे तालुक्यातील शहापुर येथे कारवाई करुन 1,11,420/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे व देवगांव येथे कारवाई करुन 13,84,000/- रु. किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे असा एकुण 14,95,420/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: 624 large and small ganja opium plants were seized by fields in Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी