शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

60 वर्षाची मामी भाच्याच्या प्रेमात झाली वेडी, आधी लग्न मोडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:53 IST

मामी फेक निकाहानामा तयार करून भाच्याच्या सासरी पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. याप्रकरणी वाद झाल्यावर मामीसहीत पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं, हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे प्रेम प्रकरणाच्या अशा अशा घटना समोर येतात ज्यावर विश्वास बसत नाही. अशीच एक घटना उत्‍तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधून समोर आली आहे. इथे राहणारी एक 60 वर्षीय महिला तिच्या 42 वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली होती आणि त्यानंतर दोघांच्याही लग्नाचा निकाहनामा तयार करण्यात आला. मामी फेक निकाहानामा तयार करून भाच्याच्या सासरी पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. याप्रकरणी वाद झाल्यावर मामीसहीत पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

येथील भाच्याचा आरोप आहे की, मामीने त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला फेक निकाहनामा पाठवला. ज्यामुळे त्याचं ठरलेलं लग्न मोडलं. महिलेचे मुलंही तिचीच साथ देत आहेत. महिलेने तिच्या नातेवाईकांसोबत घरात घुसून तोडफोड केली. भाच्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली की, त्याच्या मामाचं निधन मार्च 2022 मध्ये संशयास्पद स्थितीत झाला होता.

मामाची मुलं तरूण आहेत. भाच्याचं कपड्याचं दुकान आहे. त्याच्या संपत्तीवर मामीला कब्जा करायचा आहे. भाच्यानुसार, मामी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण भाच्याने नात्याचा हवाला देत लग्नास नकार दिला. त्यानंतर महिलेने सीमा पार केली. तिने भाच्याच्या घरावर हल्ला केला. भाच्याचा आरोप आहे की, 16 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता मामी तिची दोन मुले, सूना आणि काही लोक आले. त्यांनी घरात तोडफोड केली.

पीडित पक्षाचे वकिल उपमा भटनागर यांनी सांगितलं की, पीडित तरूणाने मामीच्या वागण्याला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरूणाने सांगितलं की, 28 डिसेंबरला त्याची वरात निघणार होती. पण त्याच्या पाच दिवसाआधी सासरच्या पत्त्यावर मामीने फेक निकाहनामा पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी