शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस पुन्हा हादरले! 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

By सायली शिर्के | Updated: October 6, 2020 13:12 IST

Hathras Crime News : अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला आहे. अलीगड जिल्ह्यातील इगलास गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीवर 15 दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. प्रकृती गंभीर असल्याने मुलीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलीचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला. तसेच आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. 

मावस भावानेच केला बलात्कार 

गावात काही काळ तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र दोषी आरोपीला पकडलं नसल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे सहा वर्षांची चिमुकली काही दिवसांसाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला गेली होती. त्याच वेळी मावस भावाने तिच्यावर बलात्कार केला. 

"जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही"

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी योग्य प्रकारे कारवाई केली नसल्याचा आरोप केला आहे. वडिलांनी माझ्या मुलीला परत आणा आणि या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपीला अटक करा असं देखील म्हटलं आहे. तसेच इगलासच्या एसओना सस्पेंड करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसRapeबलात्कारDeathमृत्यू