शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

धक्कादायक! मातेच्या कुशीतून पळवून नेत 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 06:45 IST

सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड थिएटरमागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली असून,  सागर मारुती मांढरे (रा. दुगड चाळ, सच्चाईमाता मंदिरामागे, कात्रज) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. 

पीडित मुलीचे कुटुंब मालधक्का चौकाजवळील एका झोपडपट्टीत राहते. पीडित मुलगी आईवडिलांसोबत एसटी बस स्थानकासमोरील फुटपाथवर आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास मांढरेने जबरदस्तीने तिला उचलून रिक्षामध्ये नेले. सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड थिएटरमागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारराजगुरूनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावांत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या घुमटकर (वय २९), आकाश सुनील शिंदे (२१), सूरज सुनील रोडे (२४), परेश माणिक ढमाले, अवधूत संतोष कनसे, साईनाथ मुळूक (सर्व रा. चास, ता. खेड) यांना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही सोन्या घुमटकर याने धमकी देऊन जबरदस्तीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. सोन्या, आकाश आणि सूरज रोडे (वय २४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी