धक्कादायक! मातेच्या कुशीतून पळवून नेत 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:44 AM2021-09-10T06:44:44+5:302021-09-10T06:45:09+5:30

सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड थिएटरमागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

6-year-old Chimukali raped while fleeing from her mother's arms | धक्कादायक! मातेच्या कुशीतून पळवून नेत 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

धक्कादायक! मातेच्या कुशीतून पळवून नेत 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली असून,  सागर मारुती मांढरे (रा. दुगड चाळ, सच्चाईमाता मंदिरामागे, कात्रज) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. 

पीडित मुलीचे कुटुंब मालधक्का चौकाजवळील एका झोपडपट्टीत राहते. पीडित मुलगी आईवडिलांसोबत एसटी बस स्थानकासमोरील फुटपाथवर आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास मांढरेने जबरदस्तीने तिला उचलून रिक्षामध्ये नेले. 
सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड थिएटरमागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावांत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या घुमटकर (वय २९), आकाश सुनील शिंदे (२१), सूरज सुनील रोडे (२४), परेश माणिक ढमाले, अवधूत संतोष कनसे, साईनाथ मुळूक (सर्व रा. चास, ता. खेड) यांना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही सोन्या घुमटकर याने धमकी देऊन जबरदस्तीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. सोन्या, आकाश आणि सूरज रोडे (वय २४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

Web Title: 6-year-old Chimukali raped while fleeing from her mother's arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.