मुंब्रा येथील युवकांचा प्रताप; एकाच बाईकवर ६ स्टंटबाज, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 20:28 IST2022-01-17T20:10:10+5:302022-01-17T20:28:26+5:30
सदर रस्त्यावरून मोठ मोठी वाहनांची देखील तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु असल्याने स्टंट करणा-यांची एखादी क्षुल्लक चुकही त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही

मुंब्रा येथील युवकांचा प्रताप; एकाच बाईकवर ६ स्टंटबाज, Video व्हायरल
कुमार बडदे
मुंब्राः येथील कौसा भागातील एमएम व्हँली परीसरातील रस्त्यावर एका दुचाकी वर एक,दोन,तीन नाही तर तब्बल सहा तरुण बसून चालत्या दुचाकीवर स्टंटबाजी करत असल्याचा अतिधोकादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.एकीकडे हा व्हिडिओ बघणा-याच्या मनाचा थरकाप होत असताना दुसरीकडे स्टंट करणारे मात्र निर्धास्त असल्याचे बघून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर रस्त्यावरून मोठ मोठी वाहनांची देखील तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु असल्याने स्टंट करणा-यांची एखादी क्षुल्लक चुकही त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसे होऊ नये यासाठी स्टंट करणा-यांना तसे करण्यापासून रोखण्यासाठी जेथे असे प्रकार सुरु होते. तेथे पोलिसांची गस्त वाढवून तसे करणा-यांना त्यापासून रोखवे,तसेच आपली मुले मित्रा बरोबर नेमकी कोठे जातात आणि काय करतात यावर पालकांनी देखील लक्ष ठेवावे.अशी मागणी व्हिडिओ बघणा-या नागरीकांकडून करण्यात येत आहे.