उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लुटली ६ लाख ८९ हजारांची रोकड

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2023 14:51 IST2023-04-16T14:51:27+5:302023-04-16T14:51:51+5:30

मोटर सायकलच्या डिक्कीतून बळजबरीने चोरली रक्कम

6 lakh 89 thousand cash was looted at knifepoint in Ulhasnagar | उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लुटली ६ लाख ८९ हजारांची रोकड

उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून लुटली ६ लाख ८९ हजारांची रोकड

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-२ मधूबन चौकातील अंबिका पान शॉप येथे शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता आलेल्या चौघडीने चाकूचा धाक दाखवून विनय पाहुजा या तरुणाला चाकूचा धाक दाखवून हिरा मॅरेज हॉलच्या गल्लीत नेले. तेथे मोटरसायकलच्या डिक्कीतून ६ लाख ८९ हजाराची रोखड जबरीने चोरून नेली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विनय भारत पाहुजा हे अंबिका पान सेंटर येथे शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता उभे होते. यावेळी आलेल्या चौघडीने भरदिवसा विनय पाहुजा यांना चाकूचा धाक दाखवून हिरा मॅरेज हॉल येथील एका गल्लीत नेले. तेथे शिवीगाळ व मारहाण केल्यावर बजाज चेतन इलेक्ट्रिकल मोटरसायकलच्या डिक्कीतून ६ लाख ८९ हजार रुपये चोरून नेले. याप्रकारने घाबरलेल्या विनय याने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चौघाडी विरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास सुरू केला.

Web Title: 6 lakh 89 thousand cash was looted at knifepoint in Ulhasnagar