शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 20:40 IST

Jammu and Kashmir Govt sacked six of its employees : ज्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यात काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथील शिक्षक हमीद वानी याचा समावेश आहे.

ठळक मुद्देजम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यातील जफर हुसेन भट्ट यालाही सरकारी नोकरीतून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

जम्मू - काश्मीर सरकारने आपल्या सहा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल बडतर्फ केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादावर प्रहार करत  भारतीय संविधानाच्या कलम 311 (2) (c) अन्वये या प्रकरणांची चौकशी आणि शिफारस करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमध्ये नेमलेल्या समितीने  दहशतवादी संबंध ठेवणे आणि ओजीडब्ल्यूच्या स्वरूपात काम केल्यापरकरणी सरकारी सेवेतून ६ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली.

ज्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यात काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथील शिक्षक हमीद वानी याचा समावेश आहे. नोकरीत रुजू होण्यापूर्वी अल्लाह टायगर या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर म्हणून काम केल्याचा आरोप वानीवर आहे. यासोबतच त्याला जमात-ए-इस्लामीच्या मदतीने ही सरकारी नोकरी मिळाली. 2016 मध्ये बुरहान वानीच्या काउंटर नंतर काश्मीरमध्ये देशविरोधी कारवायांसाठी चालवल्या जाणाऱ्या चलो कार्यक्रमांच्या प्रमुख वक्त्यांपैकी एक असल्याचा आरोपही वानीवर आहे. यासोबतच जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यातील जफर हुसेन भट्ट यालाही सरकारी नोकरीतून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

जफर हुसेन हे जम्मू -काश्मीर पोलिसात हवालदार म्हणून तैनात आहेत आणि त्यांना एनआयएने शस्त्र कायद्यांतर्गत अटकही केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना नेण्यासाठी त्यांची कार पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.यासह, किश्तवाडचे असलेले आणि रस्ते आणि बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्त असलेल्या मोहम्मद रफी याला बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. किश्तवाड जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना त्याच्या दहशतवादी कारवायांसाठी जागा दिल्याचा मोहम्मद रफी भट्टवर आरोप आहे. एनआयएने त्याच्यावर आधीच आरोपपत्र दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

 

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरTeacherशिक्षकHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन