शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

मुंबईत ५.७७ कोटींची विदेशी सिगारेट जप्त; समुद्रमार्गे चिंचेच्या बॉक्समधून होती तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 8:24 AM

मुंबई डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवरुन निषिद्ध असलेल्या वस्तूंची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे

मुंबई - बॉलिवूड नगरी मुंबई हे व्यापाराचे मोठे केंद्र आहे. म्हणून, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याचं सर्वपरिचीत आहे. व्यापारासह गुन्हेगारी जगतातही मुंबईचा दबदबा आहे. अंडरवर्ल्ड आणि अंमली पदार्थांची मोठी विक्री मुंबईतूनच होते. हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे समुद्रमार्गे अशा वस्तूंची तस्करीही केली जाते. मुंबईतील जवाहरलाल नेहरु बंदरातून गुप्तचर विभागाच्या पथकाने तब्बल ५.७७ कोटी रुपयांची सिगारेट हस्तगत केली आहे. समुद्रमार्गे ही विदेशी सिगारेट भारतात आणण्यात आली होती. 

मुंबई डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवरुन निषिद्ध असलेल्या वस्तूंची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. या बंदरावरील एका संशियत कंटेनरमधून चिंचाच्या बॉक्समध्ये ही विदेशी सिगारेट लपवून आणण्यात आली होती. 

चिंचाचे हे बॉक्स ४० फूट रेफ्रिजरेटेड कंटेनरमधून न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (CFS) वर उतरवण्यात आले होते. DRI च्या सखोल तपासणीत असे आढळले की, सिगारेटच्या काड्या मोठ्या चतुराईने चिंच असलेल्या पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये दडवून ठेवल्या होत्या. या सिगारेटच्या बॉक्सवर चिंच झाकण्यात आली होती. त्यामुळे, पुठ्ठ्याचे बॉक्स उघडल्यानंतरही सिगारेटचे बॉक्स दिसून येतन व्हते. दरम्यान, पथकाने जप्त केलेल्या तस्करीच्या सिगारेटची बाजारभालवाप्रमाणे अंदाजे किंमत ५.७७ कोटी रुपये आहे. तर, तब्बल ३३,९२,००० सिगारेटच्या काड्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी डीआरआय विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई