अकोला-मंगरूळपीर रोडवरून साडेपाच लाखांची रोकड जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 21:50 IST2019-09-25T21:45:35+5:302019-09-25T21:50:12+5:30
स्थायी पथकाची कारवाई : रक्कम अकोल्याच्या व्यापाऱ्याची

अकोला-मंगरूळपीर रोडवरून साडेपाच लाखांची रोकड जप्त!
ठळक मुद्दे वाहन झडतीदरम्यान ५ लाख ३८ हजार ८८५ रुपयांची रोकड जप्त केली.आचारसंहिता लागू झाल्याने दरम्यान निवडणुकीसाठी काळा पैसा वापर होऊ नये.
मूर्तिजापूर - आचारसंहिता लागू झाल्याने दरम्यान निवडणुकीसाठी काळा पैसा वापर होऊ नये. यासाठी खास स्थायी पथकाचे गठन करण्यात आले आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बार्शिटाकळी येथील पथकाने २५ सप्टेंबर अकोला - मंगरूळपीर रोडवरील कासमार पॉईंटवर वाहन झडतीदरम्यान ५ लाख ३८ हजार ८८५ रुपयांची रोकड जप्त केली.