मुंबई - चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेरील पुलावर काळबादेवी येथे व्यवसाय असलेल्या एका 55 वर्षीय इसमावर चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. चोरट्यांनी या इसमास गंभीर जखमी करून बॅग लंपास केली असून घटनास्थळी काळाचौकी पोलीस पोचले आणि त्यांनी जखमी 55 वर्षीय अशोक यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
चिंचपोकळी पुलावर 55 वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 00:15 IST