शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

५० विद्यार्थ्यांना जायचे होते कॅनडात; अडकले फसवणुकीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 07:07 IST

महिला एजंटविरोधात पोलिसांत तक्रार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उच्च शिक्षण घ्यायला कॅनडात जाण्यासाठी विमान तिकीट बुकिंग करणाऱ्या जवळपास ५० विद्यार्थ्यांना ग्रुप बुकिंगच्या नावे लाखोंचा गंडा घातला गेला आहे. यामुळे त्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्न फसवणुकीत बदलले असून याविरोधात वीणा आंबेरकर या महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी पालकांनी बोरिवली पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तक्रारदार २१ वर्षीय विद्यार्थी असून विलेपार्लेतील प्रसिद्ध कॉलेजातून ने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने कॅनडातील एका कॉलेजात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज केला होता. कॉलेजची फी, गॅरेंटेड इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट, व्हिसा, एंट्रन्स एक्झाम, ॲप्लिकेशन फी, निवासस्थान व्यवस्था आणि करन्सी कन्वर्जन यासाठी त्याने २० लाख खर्च केले. हा अभ्यासक्रम ५ सप्टेंबर रोजी सुरू होणार असल्याने कॅनडाला जाण्याचे तिकीट त्याला ऑनलाइन काढायचे होते.

बोरिवलीतच राहणाऱ्या एका मित्राने त्याला विमान तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंट आंबेरकरचा पत्ता दिला. तक्रारदार विद्यार्थ्यांनी आंबेरकरला संपर्क साधत ऑगस्टमध्ये मुंबई ते कॅनडा विमानाचे तिकीट हवे असल्याचे सांगितले.

ग्रुप बुकिंग आणि करन्सी कन्व्हर्जन!

  • आंबेरकरला भेटल्यानंतर एअर फ्रान्सच्या तिकिटाची रक्कम आणि कमिशन मिळून १ लाख २० हजार रुपये तिने मागितले. मात्र तडजोडीनंतर ग्रुप बुकिंगमध्ये १ लाख १५ हजार देण्याचे ठरले.
  • तसेच करन्सी कन्व्हर्जनच्या नावे ३०० कॅनेडियन डॉलर्ससाठी तिने १८ हजार वेगळे घेतले. असे एकूण १ लाख ३३ हजार ३०० रुपये तिला गुगल पे मार्फत पाठविण्यात आले.

...म्हणे तांत्रिक अडचण

आंबेरकरने २५ मे रोजी तक्रारदाराला ट्रॅव्हल्स समरी आणि इन्व्हाॅईस कॉपी ई-मेल केली. चार दिवसांनंतर मात्र तिकीट रद्द झाले असून एमिरेट्सची तिकिटे बुक करण्याचे म्हटले. पुन्हा ती तिकिटेही बुकिंग होत नसून केएलएम कंपनीच्या नावाचे २ ऑगस्टचे तिकीट बुक केले आणि त्याचे पीएनआर विद्यार्थ्याला व्हाट्सॲपवर पाठविले. विद्यार्थ्याने या कंपनीच्या वेबसाइटवर तपासल्यावर मात्र तिकीट बुकिंग झालेच नसल्याचे उघड झाले. त्याने आंबेरकरला फोन केल्यावर तांत्रिक अडचणींमुळे तिकीट रद्द झाल्याचे ती म्हणाली.

अखेर गुन्हा दाखल

  • आम्ही बोरिवली पोलिस ठाण्यात अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांसह आंबेरकरविरोधात तक्रार करायला आले होते. त्यापैकी माझ्या मुलासह बोरिवलीतील तीन विद्यार्थ्यांना तिने ३ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. 
  • जवळपास ५० हून अधिक विद्यार्थ्यांना तिने फसविल्याचे आम्हाला तेव्हा समजले. दरम्यान, आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.
टॅग्स :fraudधोकेबाजीStudentविद्यार्थीCanadaकॅनडा