शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:32 IST

गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मी पंतप्रधान कार्यालयाचा प्रधान सचिव असून, तुम्हाला विधानसभेचे तिकीट मिळवून देतो, असे सांगून चक्क ५० लाखांची खंडणी नाशिकमधील भाजपच्या आमदाराकडेच मागण्यात आली. याबाबत संबंधित आमदारांनी पोलिसांना कळवताच गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या.

अहमदनगर व ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही अशाच स्वरूपाचे फोन केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा (रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश) व गौरवनाथ (रा. नवी दिल्ली) अशी आरोपींची नावे असून त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘उमेदवारी यादीत नाव नाही, तिकिटासाठी पैसे द्या’

  • आलेला फोन फसवणूक करणारा असल्याचे लक्षात घेताच संबंधित आमदारांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा फोन ६ ऑक्टोबरला आला होता. प्रत्यक्ष कोणत्याही उमेदवाराचे नाव न घेता या भामट्याने नाशिकसह इतर ठिकाणचे तिकीट (उमेदवारी) रद्द झाल्याचे सांगितले होते.
  • भामट्याचे धारिष्ट्य इतके, की त्यांनी एका पत्राचे वाचन करीत त्यात उमेदवारी यादीत तुमचे नाव नाही, असे सांगितले आणि विधानसभेचे तिकीट पाहिजे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून पैशाची मागणी केली.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४fraudधोकेबाजीMLAआमदारArrestअटक