शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

२०२० मध्ये लैंगिक छळाच्या गुन्ह्यात ५० जणांना फाशी; नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 05:19 IST

सर्वोच्च न्यायालयाने चार गुन्ह्यांतील सहा जणांची फाशी कायम केली, तर तीन गुन्ह्यांतील चार जणांची शिक्षा कमी करून जन्मठेप दिली

खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : २०२०मध्ये देशभरातील सत्र न्यायालयांनी ७७ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. यापैकी तब्बल ४६ जणांना लैंगिक अत्याचार करून खून केल्याबद्दल, तर चार जणांना अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली दरवर्षी मृत्युदंडाच्या शिक्षेसंबंधीचा अभ्यास करून प्रकल्प ३९अ या नावाने प्रसिद्ध करते. त्यांनी २०२०चा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

२०१९च्या १०३ जणांच्या फाशीच्या शिक्षेच्या तुलनेत गतवर्षी कमी लोकांना ही शिक्षा दिली असली तरी याचे मुख्य कारण कोरोना महामारीचा न्यायालयीन कामकाजावर झालेला परिणाम हादेखील आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी पहिल्या तिमाहीत ४८ जणांना फाशी सुनावण्यात आली होती. राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड उच्च न्यायालयांनी प्रत्येकी एक अशा तीन जणांची फाशीची शिक्षा २०२०मध्ये कायम केली. तर सर्व उच्च न्याायलयांनी २२ जणांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेप दिली. पाच जणांना दोषमुक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने चार गुन्ह्यांतील सहा जणांची फाशी कायम केली, तर तीन गुन्ह्यांतील चार जणांची शिक्षा कमी करून जन्मठेप दिली. दि. ३० जानेवारी २०१६ रोजी अपहरण करून खून केलेल्या दोन आरोपींना नागपूर सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षे कैदेत बदलली. यवतमाळ सत्र न्यायालयाने २०१५ मध्ये बलात्कार व पोक्सोअंतर्गत शत्रुघ्न मेश्राम याला दिलेली फाशी कमी करून २५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली.

 

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारPoliceपोलिस