शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने वायरने गळा आवळून केली हत्या अन् गोणीत लपवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 19:59 IST

Murder Case : पोलिसांच्या चौकशीत समरीनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने वायरने फरदीनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.  भाऊ फरजान याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

भोपाळ - राजधानी भोपाळमध्ये घरासमोर खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकल्याचा शेजारच्या महिलेने निर्घृण हत्या केली. महिलेने त्याचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर भावाच्या मदतीने चिमुकल्याचा मृतदेह गोणीत लपवून ठेवला. त्याची पोलखोल सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. बुधवारी दुपारी जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या घरासमोर ५ वर्षाच्या मुलगा खेळत असे. त्यामुळे मुलाच्या घरच्यांसोबत तिचे रोजच वाद होत होते. हा वादच चिमुकल्याच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महिलेने तिच्या भावाच्या मदतीने मुलाची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, जेलरोडवरील जादा कॉलनीत राहणारा जावेद खान हा टेलर आहे. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा फरदीन सन टॉप स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता. बुधवारी दुपारी तो घरासमोर खेळत होता. आई शाहिदा घरातच होती. दरम्यान, शाहिदा बाहेर मुलाला पाहण्यासाठी आली. तेव्हा तिला तिचा मुलगा दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला, पण फरदीनचा सुगावा लागला नाही. मुलगा कुठेच न सापडल्याने तिने चार वाजता पती जावेदसह जहांगीराबाद पोलीस ठाणे गाठले.सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले रहस्यमुलाच्या हरवल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी तपास सुरू केला. हत्येचा खुलासा करताना परिसरातील एका मुलाकडून आणि सीसीटीव्हीवरून पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. पोत्यात भरल्यानंतर फरदीनला ऑटोमध्ये नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलाने पोलिसांना सांगितले. फरदीनच्या घरासमोर राहणाऱ्या समरीनवर पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तिला बोलावून घेतले. यावर ती टाळाटाळ करू लागली. पोलीस तात्काळ समरीनचे मामा चोला यांच्याकडे पोहोचले. जिथे फरदीनचा मृतदेह त्याच्या घरात एका गोणीत सापडला होता. पोलिसांच्या चौकशीत समरीनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने वायरने फरदीनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.  भाऊ फरजान याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकcctvसीसीटीव्ही